भारताच्या पूर्व किनाऱ्यावर नैसर्गिक बंदरे कमी आहेत

भारताच्या पूर्व किनाऱ्यावर नैसर्गिक बंदरे कमी आहेत उत्तर : i) भारताचा पूर्व किनारा नदयांनी वाहून आणलेल्या गाळाच्या संचयनातून तयार झाला आहे. पूर्व किनाऱ्यावर अनेक ठिकाणी गाळाचे त्रिभुज प्रदेश आढळतात. ii) भारताच्या पूर्व किनारपट्टीजवळ पाण्याची पातळी खूप खोल आढळत नाही. भारताच्या पश्चिम किनारपट्टीजवळ पाण्याची पातळी तुलनेने जास्त खोल आहे.  iii) गाळ व पाण्याची कमी खोल पातळी … Read more

ब्राझीलमध्ये नियमित हिमवर्षाव होत नाही

ब्राझीलमध्ये नियमित हिमवर्षाव होत नाही. उत्तर : i) सर्वसाधारणपणे शीत कटिबंधातील देशांत ध्रुवीय वाऱ्यांमुळे नियमित बर्फवृष्टी होते, त्याचप्रमाणे एखादया देशातील समुद्रसपाटीपासून अतिउंच असणाऱ्या पर्वतीय अतिथंड प्रदेशात हिमवर्षाव होतो. ii) ब्राझील या देशाचे स्थान शीत कटिबंधात नसून, ते उष्ण कटिबंधात आहे.  iii) याशिवाय ब्राझील देशात अतिउंच पर्वतीय प्रदेश नाहीत. त्यामुळे ब्राझीलमध्ये नियमित हिमवर्षाव होत नाही.

हिमालयातील जवळजवळ सर्व नदया बारमाही स्वरूपाच्या आहेत

हिमालयातील जवळजवळ सर्व नदया बारमाही स्वरूपाच्या आहेत. उत्तर : i) हिमालयातील बहुतांश नदया अतिउंचावरील बर्फाच्छादित पर्वतशिखरांमधून उगम पावतात. ii) उन्हाळ्यात बर्फ वितळल्यामुळे उन्हाळ्यातही या नद्यांना पाणी मिळते.  iii) पावसाळा, हिवाळा व उन्हाळा या तिन्ही ऋतूत पाणीपुरवठा होत असल्यामुळे हिमालयातील जवळजवळ सर्व नदया बारमाही स्वरूपाच्या आहेत.

भारताकडे एक तरुण देश म्हणून पाहिले जाते

भारताकडे एक तरुण देश म्हणून पाहिले जाते. उत्तर : i) भारतातील लोकसंख्येत कार्यशील गटातील लोकांचे (तरुणाईचे) प्रमाण तुलनेने अधिक आहे. ii) भारताच्या एकूण लोकसंख्येतील सुमारे ५१ टक्के लोकसंख्या ही कार्यशील आहे. iii) भारतातील लोकसंख्येत अकार्यशील (ज्येष्ठ नागरिक व बालक) गटातील लोकांचे प्रमाण तुलनेने कमी आहे. म्हणून भारताकडे तरुण देश म्हणून पाहिले जाते.

ब्राझील देशास जगाचा कॉफी पॉट असे संबोधले जाते

ब्राझील देशास जगाचा कॉफी पॉट असे संबोधले जाते. उत्तर : i) कॉफीच्या उत्पादनात ब्राझीलचा जगात प्रथम क्रमांक लागतो.  ii) जगातील कॉफीच्या एकूण उत्पादनापैकी सुमारे ४० टक्के कॉफीचे उत्पादन ब्राझील देशात होते. iii) ब्राझील देशातून कॉफीची सर्वाधिक प्रमाणावर निर्यात केली जाते. म्हणून, ब्राझील देशास जगाचा कॉफी पॉट’ असे संबोधले जाते.

ब्राझीलकडे वेगवेगळ्या दिशांनी वारे येण्याचे कारण काय असावे

ब्राझीलकडे वेगवेगळ्या दिशांनी वारे येण्याचे कारण काय असावे ? उत्तर : i) ब्राझीलच्या उत्तर भागातून विषुववृत्त जाते. विषुववृत्ताजवळ कमी दाबाचा पट्टा निर्माण होतो. ii) ब्राझीलच्या विषुववृत्ताजवळील भागात उत्तर गोलार्धातील व दक्षिण गोलाघांतील जास्त दाबाच्या पट्ट्याकडून वारे वाहू लागतात. iii) ब्राझीलमधील विषुववृत्ताच्या उत्तरेकडील भागात ईशान्य दिशेकडून पूर्वीय वारे वाहतात. iv) ब्राझीलमधील विषुववृत्ताच्या दक्षिणेकडील भागात आग्नेय दिशेकडून … Read more

तारे लुकलुकतात पण ग्रह आपणास लुकलुकताना दिसत नाहीत

तारे लुकलुकतात पण ग्रह आपणास लुकलुकताना दिसत नाहीत उत्तर : i) तारे पृथ्वीपासून खूप दूर असल्याने त्यांचे वर्तन बिंदू प्रकाशम्रोतासारखे असते. हवेची होणारी सततची हालचाल, तसेच घनता व तापमान यांमधील बदल यामुळे वातावरण स्थिर नसते. परिणामी त्या भागातील हवेचा अपवर्तनांक सतत बदलत असतो. म्हणून ताऱ्यांची आभासी स्थिती व प्रखरता यात सतत बदल होत असतो. त्यामुळे … Read more

हिवाळ्यात कधी कधी रात्री दव पडते

हिवाळ्यात कधी कधी रात्री दव पडते उत्तर : i) हिवाळ्यात रात्रीच्या वेळी हवेचे तापमान दवबिंदू तापमानइतके कमी किंवा त्याहूनही कमी होऊ शकते.  ii) तापमान दवबिंदू तापमानापेक्षा खाली गेल्यास हवेतील अतिरिक्त पाण्याच्या वाफेचे संघनन होते आणि ती थंड पृष्ठभागावर जमा होते. थंड पृष्ठभागावर जमा झालेले हे पाणी म्हणजेच दव होय. 

जलाशयाचा तळ वर उचलल्यासारखा भासतो

जलाशयातील पाण्याची खोली असते, त्यापेक्षा ती कमी भासते.  किंवा   जलाशयाचा तळ वर उचलल्यासारखा भासतो.  किंवा  पाण्याने भरलेल्या डबक्याचा तळ वर उचलल्यासारखा दिसतो.  उत्तर : i) जलाशयाच्या तळाकडून निघालेले प्रकाशकिरण पाणी या घन माध्यमातून हवा या विरल माध्यमामध्ये प्रवेश करीत असता, ते स्तंभिकेपासून दूर जातात, म्हणजेच त्यांचे अपवर्तन होते. ii) त्यामुळे अपवर्तित किरण जलाशयाच्या तळाकडून न … Read more

शीतपेयाच्या बाटलीच्या बाह्य पृष्ठभागावर पाण्याचे थेंब जमा होतात

शीतपेयाच्या बाटलीच्या बाह्य पृष्ठभागावर पाण्याचे थेंब जमा होतात उत्तर : i) शीतपेयाच्या बाटलीच्या बाह्य पृष्ठभागाचे तापमान वातावरणाच्या तापमानापेक्षा कमी असते. ii) त्यामुळे हवेतील अतिरिक्त पाण्याच्या वाफेचे संघनन होऊन बाटलीच्या बाह्य पृष्ठभागावर पाण्याचे थेंब जमा होतात.